Bigul Logo

सन्माननीय महोदय,

आधुनिक युगाच्या बदलत्या प्रवाहासोबत संपूर्ण जग डिजिटल तंत्रज्ञानाच्या दिशेने प्रवास करत आहे. या डिजिटल युगात सर्वच क्षेत्रे तंत्रज्ञानाच्या आधारे कार्यरत होत आहेत, आणि निवडणूक व्यवस्थापन याला अपवाद कसा असू शकेल? त्यामुळे आज निवडणुका जाहीर झाल्या की, त्यात प्रभावी प्रचारही आवश्यक ठरतो, तो प्रचारदेखील डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करूनच साध्य होऊ शकतो. नाईस आर्ट मिडियाने २०१८ पासून डिजिटल युगाच्या दिशेने पाऊल टाकले, आणि गेल्या ६ वर्षांच्या मेहनती आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे आम्ही निवडणूक प्रचाराच्या डिजिटल क्षेत्रात ठसा उमटवला आहे. आमच्या 'बिगुल' या डिजिटल प्रचार यंत्रणेने लोकसभा, विधानसभा, नगरपंचायत, नगरपरिषद, आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये यशस्वीरित्या प्रचार व्यवस्थापन केले आहे. निवडणूक काळात उमेदवारास आपले सर्व नियोजन स्वतः पाहणे अवघड ठरते, तसेच मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. अशावेळी, आमची 'बिगुल' प्रचार यंत्रणा उमेदवारांच्या संदेशाला प्रत्येक मतदारापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम करते. आमचा हेतू उमेदवारांना विजयाच्या मार्गावर नेण्याचा आहे, आणि आगामी निवडणुकांमध्ये आम्हाला तुमच्यासाठी सेवा करण्याची संधी मिळेल, अशी माफक अपेक्षा आहे. आपल्या सहकार्याची आम्ही विनम्र अपेक्षा बाळगतो.

धन्यवाद.
आपला सेवक, 'बिगुल' निवडणूक प्रचाराच्या डिजिटल नाद....

Meet Our Political Clients

WhatsApp
Call Us